सुपर ओव्हर मध्ये साई फार्मची बाजी
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत 13 वर्षाखालील मुलांच्या विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात जेवर गॅलरी डायमंड तर साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने कार एंटरप्राइजेस सुपर ओव्हर मध्ये बाजी प्रत्येकी एक 2 गुण मिळविला. युनियन जिमखाना आजच्या पहिल्या सामन्यात जेवर गॅलरी डायमंड संघाने साईराज वॉरियर्स पालेकर अकादमी संघाचा 53 धावांनी पराभव केला. जेवर गॅलरी डायमंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 बाद 157 धावा केल्या.
त्यात विवान भूसदने 48 चेंडूत 4 चौकारांसह 56, सचिन तलवार 3 चौकारांचा 34 तर मोहम्मद हमजा, कृष्णा पाटील व अम्मार पठाण यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. साईराज वॉरिअर्स पालेकर अकादमी तर्फे शाहरुख धारवाडकरने 2 तर श्लोक चडीचाल व नीरज एम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज वॉरियर्स पालेकर अकादमी संघाने 21 षटकात सर्वगडी बाद 104 धावा केल्या. त्यात सलाममीवीर अजय लमानेने 5 चौकार 1 षटकारांसह 38, शाहरुख धारवाडकरने 2 चौकारांसह 13 धावा केला. जेवर गॅलरी डायमंड तर्फे विवान भूसदने गोलंदाजीत ही कमाल करताना 14 धावात 5 गडी बाद केले.
अम्मार पठाणने 2 तर विनायक एन व मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामनावीर विवान भूसद व इम्पॅक्ट खेळाडू अम्मार पठाण यांना प्रमुख पाहुणे गदगेपा नागनावर रवी कुंदरनाड व प्रवीण कराडे यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात थरारक लढतीत साई फार्म स्पोर्ट्स क्लबने सुपर ओवर मध्ये बाजी मारताना कार एंटरप्राइजेस संघाचा निसटता पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 25 षटकात 4 गडीबाद 133 धावा केल्या. प्रणव जेने 4 चौकारांसह 37, समर्थ चेन्नईगिरीने 31, साईराज पोरवालने 25 धावा केल्या.
शार्प एंटरप्राइजेस तर्फे विश्रुत कुंदरनाड याने दोन तर जियान सलीमवाले याने एक गडी बाद केला उत्तरा दाखल शार्प इंटरप्राईजेस ने सुद्धा 24. 4 षटकात सर्व बाद 133 धावा केल्या व सामना टाय झाला अक्षय बलिगर व श्रेयांश याने प्रत्येकी 19, विश्रुत कुंदरनाडने 17 धावांचे योगदान दिले. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे निखिल राठोड व कौस्तुभ पाटील यांनी प्रत्येकी 3 तर साईराज पोरवालने एक गडी बाद केला. सुपर ओवर मध्ये साईराज पोरवालने पहिल्या दोन चेंडूंवर दोन बळी घेत खळबळ माजवली शार्प एंटरप्राइजेस संघ वाईडच्या रूपात एकच धाव करू शकला तर साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने बिनबाद 2 धावा जमवत हा सामना जिंकला. प्रमुख पाहुणे रमेश मोठेबेन्नूर प्रमोद बेकवाडकर व विश्वनाथ शेट्टर यांच्या हस्ते सामनावीर साईराज पोरवाल व इम्पॅक्ट खेळाडू निखिल राठोड यांना सन्मानित करण्यात आले.









