प्रतिनिधी,विटा
Khanapur Taluka Bazar Committee Election : खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी काँग्रेस- शिवसेना-भाजप महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. सत्ताधारी गटाच्या सर्व १७ जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या. तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला बाजार समितीत खातेही खोलता आले नाही. निकालानंतर सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याचे आतिषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला.
खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी काल शुक्रवारी ९१.३८ टक्के मतदान झाले होते. आज शनिवारी येथील लीलाताई देश चौगुले प प्राथमिक विद्यामंदिरच्या सभागृहात मतमोजणी पार पडली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिपाली कोळेकर यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश भिंगारदिवे यांनी काम पाहिले. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली तर साडेबारा वाजण्याच्या सुमारास मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. तहसिलदार उदयसिंह गायकवाड यांनी मतमोजणी केंद्राला भेट देवून पाहणी केली.
खानापूर आणि कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या बाजार समितीसाठी विटा आणि कडेगांव अशा दोन ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीला दोन्ही तालुक्यातील मतांचे एकत्रिकरण करण्यात आले. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी पावणेबाराच्या दरम्यान पहिला निकाल अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील आला. यामध्ये सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार भगवान जगन्नाथ नालगे यांनी ७४६ मते घेऊन बाजी मारत विजयाचे खाते उघडले. त्यानंतर सहकारी संस्था गटातील भटक्या विमुक्त प -वर्गातील निकाल देखिल सत्ताधारी गटाच्या बाजूने आला. सत्ताधारी गटाचे विजय पंढरीनाथ होनमाने विजयी झाले. त्यांना सर्वाधीक १ हजार ३० मते मिळाली.
त्यानंतर निकालाचा कल स्पष्ट झाला. महिला गटातील निकालाने विजयावर शिक्कामोर्तब झाले. सोसायटी विभागांमध्ये सर्वाधिक ११ जागा होत्या. यातील काही मतपत्रिकेत क्रॉस वोटिंग असल्यामुळे मतमोजणीला काही अंशी वेळ लागला. अखेरीस सोसायटी गटातील सर्वही ११ जागांवर सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने बाजीमारत मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. या गटात जवळपास ५९ मते बाद झाली. सत्ताधारी गटातील उमेदवारांना ९६५ ते ८७७ यादरम्यान मते मिळाली. तर विरोधी गटातील उमेदवारांना २५६ ते ३३३ मते मिळाली. ग श्रामपंचायत गटात चार जागा होत्या. यामध्ये सत्ताधारी शेतकरी आघाडीच्या पॅनेलला ६८५ ते ७४३ मते मिळाली. तर विरोधी गटाला २३८ ते २६३ मते मिळाली.
व्यापारी गटात विरोधकांनी एक जागा लढवली होती. यामध्ये सत्ताधारी गटाचे महेंद्र कदम आणि अनिल हराळे हे अनुक्रमे ३३८ आणि २८७ मते मिळवून विजयी झाले. विरोधी विकास माने यांना १७२ मते मिळाली. इतर मागासवर्गीय गटात माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख हे १ हजार २३ मते घेत विजयी झाले. विरोधी सिद्धेश्वर धावड यांना ३१७ तर प्रसाद लोखंडे यांना ८ मते मिळाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









