बेळगावचा विकास सूर्यवंशी पहिला उपविजेता, वृषभ वशिष्ठ उत्कृष्ट पोझर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
होस्पेट येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व गुडलक व्यायामशाळा व पॉवरफिटनेस झोन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विजयनगर श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत धारवाडच्या विजय पी. ने विजयनगर श्री हा मानाचा किताब पटकाविला. बेळगावच्या विकास सूर्यवंशीने पहिले उपविजेतेपद पटकाविले. रायचूरच्या वृषभ वशिष्ठने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
व्यंकटेश्वर कल्याण मंडप, होस्पेटच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार 7 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 55 किलो गट : 1) शशिधर (उडुपी) 2) जोतिबा सावंत (बेळगाव) 3) दर्शन जी. (चित्रदुर्ग) 4) सुनील रायचूर (रायचूर)
5) के. अप्पू (विजयनगर). 60 किलो गट : 1) धीरजकुमार (उडुपी) 2) के. सलिम बाशा (विजयनगर) 3) मोहम्मद सुलेमान (गंगावती)
4) उमेश गंगने (बेळगाव) 5) हनिफ रेहमान (विजयनगर). 65 किलो गट : 1) विकास शहापूरकर (बेळगाव) 2) मेहबूब पाशा (बळ्ळारी)
3) समशेर कारवी (उडुपी) 4) वृषभ वशिष्ठ (रायचूर) 5) शिवकुमार पाटील (बेळगाव). 70 किलो
गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव) 2) विनय डोणकरी (बेळगाव) 3) संपत कुमार (शिमोगा)
4) अरुण कालिमठ (धारवाड) 5) समीर पठाण (धारवाड). 75 किलो गट : 1) तप्पसकुमार नायक (चित्रदुर्ग) 2) अफ्रोज ताशिलदार (बेळगाव) 3) विजय पाटील (बेळगाव) 4) मंजुनाथ आर. (विजयनगर) 5) हैदरअली नदाफ (बागलकोट). 80 किलो
गट : 1) विजय पी. (धारवाड)
2) गजानन काकतीकर (बेळगाव) 3) दयानंद निलजकर (बेळगाव) 4) काशिनाथ नायकर (धारवाड). 85 किलो गट : 1) विशाल चव्हाण (बेळगाव) 2) होसटन ब्रेस (उडुपी) 3) जहर सिंग (उडुपी) 4) रवी एस. (कोप्पळ) 5) ओंमकार कडेमणी (बेळगाव). 85 किलोवरील गट : 1) विकास सूर्यवंशी (बेळगाव) 2) सफवान मोहम्मद (मंगळूर) 3) व्ही. बी. किरण (बेळगाव)
4) गौतम (उडुपी) 5) सय्यद एच. (कोप्पळ). त्यानंतर विजयनगर श्री किताबासाठी शशिधर, विकास शहापूरकर, प्रताप कालपुंद्रीकर, तप्पसकुमार नायक, विजय पी., विशाल चव्हाण, विकास सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. विजय पी. व विकास सूर्यवंशी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये विजय पी.ने विजयनगर श्री हा मानाचा किताब पटकाविला. तर विकास सूर्यवंशीने पहिले उपविजेतेपद पटकाविले. रायचूरच्या वृषभ वशिष्ठने उत्कृष्ट पोझर हा किताब पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानाचा किताब, रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.









