वृत्तसंस्था/ माँटे कार्लो (मोनॅको)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्वीसचा माजी विजेतचा टेनिसपटू वावरिंकाने शानदार विजयाने आपले पुनरागमन केले.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात वावरिंकाने हॉलंडच्या ग्रीकस्पूरचा 5-7, 6-3, 6-4 असा पराभव केला. हा सामना अडीज तास चालला होता. वावरिंकाचा पुढील फेरीतील सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिजशी होणार आहे. या स्पर्धेतील अन्य सामन्यात फ्रान्सिस्को सेरुनडोलोने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचा 6-3, 6-4 तसेच जॅक ड्रेपरने अर्जेंटिनाच्या सेबेस्टियन बाझचा 6-3, 7-5 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.









