मुंबई : विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी अलीकडेच शाहरुख खानच्या 2001 मधील अशोका चित्रपटाच्या सेटवरील जुना फोटो शेअर केला आहे. यावर ‘विकी एक दिवस बॉलीवूडमध्ये काम करेल याची कोणीही कल्पना केली नसेल’ अशी एक पोस्टदेखील लिहिली आहे. या फोटोमध्ये शाहरूख खानसोबत विकी कौशल आणि त्याचा भाऊ सनी कौशल यांच्याबरोबर अशोका चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुवर्धन दिसत आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये, शाम कौशलने म्हटले आहे की, “2022 मध्ये विष्णुवर्धन आणि विकी या दोघांनी अनुक्रमे शेरशाह आणि सरदार उधमसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. जेव्हा दोघांचा शाहरुखसोबतचा फोटो क्लिक केला गेला तेव्हा ते अकल्पनीय होते. शालेय दिवसात काढलेल्या छायाचित्रात विकी ओळखून येत नाही. विकि अभिनेता शाहरुखच्या शेजारी उभा होता, शाहरूखने अशोकाच्या भूमिकेत, लांब केसांसह काळा पोशाख परिधान केला होता.” संतोष सिवन दिग्दर्शित अशोकामध्ये करीना कपूर, डॅनी डेन्झोंगपा, हृषिता भट्ट यांच्याही भूमिका होत्या.
शाम कौशलने पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकजणाने लिहिले की, “कोणाला वाटले नसेल की तोच माणूस (विकी) कतरिना कैफला मिळेल.” विकी आणि कतरिनाचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले आहे. आणखी एका चाहत्याने विकीच्या जुन्या फोटोवर “डेस्टिनड फॉर ग्रेटनेस” अशी कमेंटही केली.
यापूर्वी 2019 मध्ये, विकी कौशलने शाहरुखसोबतच्या आपल्या बालपणीच्या फोटोची झलक शेअर केली होती. अशोकाच्या सेटवर भेटल्यानंतर, एका अवॉर्ड शोचे सह-होस्टिंग करणाऱ्या दोघांच्या फोटो शेअर केला होता. आणि फोटोसोबत विकीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर “स्वप्ने खरी होतात.” लिहिले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









