मेरे महबूब मेरे सनम चित्रपटातील जोडी
करण जौहरकडून मेरे महबूब मेरे सनम नावाचा चित्रपट निर्मित केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. विक्की कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्कने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणर आहे.
या चित्रपटचे नाव प्रथम ‘रौला’ निश्चित करण्यात आले होते. परंतु आता नाव बदलून ‘मेरे महबूब मेरे सनम’ करण्यात आले आहे. या नावाचा चित्रपटाच्या कहाणीशी मोठा संबंध आहे. याच नावाने चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. हे नाव शाहरुख खानच्या चित्रपटाती एका गाण्यावरून प्रेरित असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘मेरे महबूब मेरे सनम’ हा चित्रपट लव्ह ट्रायंगलवर आधारित असणार आहे. यात विक्की कौशल, तृप्ति डिमरी आणि एमी विर्क यांची महत्त्वाची भूमिका आहे. विक्की कौशल पहिल्यांदाच एमी विर्क आणि तृप्तिसोबत दिसून येणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.
विक्की कौशल याचबरोबर ‘लुक्का-छुपी2’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात सारा अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. विक्की कौशल याचबरोबर सॅम बहादुर या चित्रपटात दिसून येणार आहे.









