करण जौहरकडून चित्रपटाची निर्मिती
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळविले आहे. सारा अली खानसोबत पडद्यावरही त्याच्या जोडीला मोठी पसंती मिळाली आहे. आता विक्की आणखी एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विक्की कौशल हा ‘कला’ चित्रपटात तृप्ति डिमरीसोबत दिसून येईल. करण जौहरकडून निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. या चित्रपटामुळे मला चांगल्या लोकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला असल्याचे तृप्तिने म्हटले आहे.
अमेझॉन प्राइम आणि धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱ्या चित्रपटात विक्की तसेच तृप्तिसोबत पंजाबी कलाकार एमी विर्क्क देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. विक्की आणि तृप्ति यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.









