नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गांबिया या देशाचे उपाध्यक्ष बदारा आलीयू जूफ यांचे भारतात निधन झाले आहे. ही घोषणा या देशाचे अध्यक्ष अदामा बॅरो यांनी त्यांच्या देशात केली. जूफ हे भारताच्या दौऱयावर आले होते. मात्र, ते अचानक आजारी पडले आणि त्या आजारातच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जूफ यांची गांबियाच्या उपाध्यक्षपदी निवड 2022 मध्ये करण्यात आली होती. ते त्यापूर्वी त्या देशाचे उच्चशिक्षण, संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री 2017 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत होते. सक्षम नेते म्हणून त्यांचा परिचय होता.









