अध्याय सोळावा
आपल्या विभूतींबद्दल पुढे सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, एक पळभरही न चुकता निरंतर सावधपणाने दक्ष राहाणारा जो संवत्सरात्मक काळ, तो मीच होय.
रेणूपासून संवत्सरापर्यंत लव, निमिष, दिवस इत्यादि मानांची कालगणना मी संकर्षणच सावधानतेने करीत असतो.
कृष्ण म्हणतात, मधु-माधव या दोन महिन्यांचा जो वसंत ऋतु, तो मी आहे. सर्व महिन्यांमध्ये, धान्ये परिपक्व दशेस आणणारा आल्हादकारक असा मार्गशीर्ष महिना मी आहे. पंचांगांत ज्याला गणता येत नाही, नक्षत्रात असूनही जे सर्वदा गुप्त असते, अदृश्य असताही सुज्ञ लोकांना सापडते ते अभिजित् नक्षत्र मी आहे असे श्रीहरि म्हणतात. युगांमध्ये ज्यात सर्व धर्म यथासांग चालतात, अधर्माचा भाग मुळीच असत नाही, ते कृतयुग मी आहे. उद्धवा ! धैर्यामध्ये आत्मधैर्य हे मोठे विलक्षण आहे.
असे धैर्यशाली जे असित आणि देवल ते मीच होय, असे निश्चित समज. हृषीकेशी म्हणतात, वेदांचे विभाग करण्याविषयी केवळ राजहंस आणि ज्याने वेदांची निवड करून ते ब्राह्मणांना दिले असा जो द्वैपायन व्यास तो मी. लक्ष्मीपती म्हणतात, जे कवि आहेत, त्यामध्ये खरोखर परमार्थज्ञानी जो उशना (शुक्राचार्य) कवि, तो मी. साक्षात् आत्मस्वरूप ज्ञानच असा शुक्राचार्य मी होय. षड्गुणैश्वर्याने भाग्यवान्, पूर्णाशाने भगवत्स्वरूप व वासुदेव ह्या नावाने प्रसिद्ध असणारा, असा श्रीकृष्णरूपाने मीच येथे आहे असे समज. आणखी उद्धवा ! भगवद्भक्तांमध्ये अत्यंत ाtरञ्च्÷ जो तू, तो मीच होय, हे लक्षात ठेव. असे श्रीकृष्णाने म्हणतांच उद्धवाने श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन केले.
उद्धवाने नमस्कार करताच श्रीकृष्णानेही त्याला आलिंगन दिले. तेव्हा सर्व त्रैलोक्मय आनंदाने भरून गेले. इतका आत्मानंदाचा केवळ मेघ असा श्रीकृष्ण संतुष्ट झाला.
उद्धव आणि श्रीकृष्ण दोन्ही एकरूप झाले. ‘मी’ तोच ‘तू’ असे जे श्रीकृष्ण बोलले होते, ते त्यांनी उद्धवाला स्वतः प्रत्यक्षच खरे करून दाखविले. दोघांचे दोन भिन्न भाव मोडून जाऊन उद्धव श्रीकृष्णच झाला आणि श्रीकृष्णाच्या अंगीही संपूर्ण उद्धवपणच बिंबून राहिले.
त्यामुळे उद्धव आश्चर्यचकित झाला आणि श्रीकृष्णाचा प्रियभक्त काय तो मीच असे म्हणून क्षणभर आपल्या ठिकाणीच मोठेपणाने फुगला. हे जाणून श्रीकृष्ण म्हणाले, वानरांमध्ये हनुमंत तो मी असे श्रीकृष्ण म्हणाले. तेव्हा उद्धवाचा अभिमान नष्ट झाला आणि तो मनातल्या मनातच खजिल होऊन गेला. कारण की, जेथे वानरे आणि श्वापदेसुद्धा कृष्णाची माझ्याहून प्रियकर भक्त झाली, तेथे हरिभक्तांचा अंतच लागणे कठीण. मग मज दासाचा तेथ पाड काय? असा मनामध्ये विचार करू लागताच त्याने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, खरोखर आपल्या ज्या विभूती आहेत त्या कृपा करून सर्वच मला सांगाव्यात. तेव्हा श्रीकृष्ण हसून काय म्हणाले, विद्याधर असा जो सुदर्शन तो खरोखर माझीच विभूती होय. रत्नांमध्ये पद्मराग, सुंदर वस्तूंमध्ये कमळाची कळी, तृणांमध्ये कुश आणि हविर्दव्यांमध्ये गाईचे तूप मी आहे. मी व्यापार करणाऱयांमध्ये राहणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणाऱयांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे.
परब्रह्माच्या ठायी जीवपणाची कल्पना आणि जीवाचे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्मय ह्या सर्व कपटाचा कर्ताही मीच. हे कपट देव-देवतांनाही अतक्मर्य आहे. ब्रह्मदेव व शंकर हे आपल्याला मायेचे नियंते असे म्हणवितात, पण तोच शंकर मोहिनीदर्शनाने मी फसविला आणि ब्रह्मदेव गाइची वत्से चोरून नेण्यात मी फसविला ! म्हणून खरोखर ठकातला महाठक तो एक मीच. सहनशीलांमध्ये सहनशक्ती म्हणतात ती मीच. आणखी श्रीपती सांगतात, सात्त्विकांची जी मूळची सत्त्ववृत्ती तीही मीच स्वतः होय. बलवानांच्या ठिकाणी अत्यंत प्रबळ असे जे मनोबळ, शरीरबळ व धैर्यबळ असते व ज्याच्या योगाने तो यत्किंचितही डगमगत नाही, ते धैयबळही मीच श्रीकृष्ण होय.
क्रमशः







