न्हावेली / वार्ताहर
शासनाकडून सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे.मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करत आहेत.
मराठा समाजामध्ये आर्थिक मागासलेपणा असलेल्यांची संख्या बरिच जास्त असून हुशार व होतकरु विद्यार्थी शैक्षणिक सवलती पासून वंचित राहत आहे.म्हणून वेत्ये ग्रामस्थांनी एकमुखी जरांगे पाटीलांना बैठक घेऊन समर्थन दिले आहे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. मराठा आंदोलनास पाठींबा म्हणून सकल मराठा समाज वेत्ये वासियांचा वतीने ३ रोजी संध्याकाळी ७ वाजता रुक्मिणी ट्रान्सस्पोर्ट ॲाफिस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सर्व मराठी बांधवांनी उपस्थित राहून एकमुखी पांठिबा दिला व सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका यांनी आयोजित केलेल्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठरविण्यात आले .









