मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
न्हावेली / वार्ताहर
आजगाव (ता.सावंतवाडी) येथील श्री देव वेतोबा वर्धापन दिन रविवार दिनांक १८ मे २०२५ रोजी होत असून ,या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी:- ६:२५ वाजता अभिषेक,लघुरुद्र, व आरती,दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्रौ ८:०० वाजता पालखी व रात्रौ ठीक ८:३० वाजता “मानी मराठा” नाटकाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व ग्रामस्थ आजगाव यांनी केले आहे.









