प्रतिनिधी /बेळगाव
राजा फोटो स्टुडिओच्या जुन्या कर्मचाऱयांच्यावतीने ज्ये÷ छायाचित्रकार राजा कट्टी यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. राजा कट्टी यांनी शिकविलेल्या फोटोग्राफीमुळे बेळगाव परिसरात अनेक छायाचित्रकार घडू शकले, असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला अन्वर बेग, दिनकर पवार, शशी रजपूत, हरिष पाटील, विनायक बेळगावकर, शेखर लोखंडे, संजय जाधव, प्रवीण शिंदे यासह इतर उपस्थित होते.









