ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Actor Sameer Khakkar passed away ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नुक्कड’मधील खोपडी या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. खक्कर यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज बोरिवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
खक्कर मागील 38 वर्ष मनोरंजन सृष्टीत सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. मधल्या काळात त्यांनी मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. मात्र, अमेरिकेतून परत आल्यावर मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मला आयुष्यभर लोकांचे मनोरंजन करायचे आहे, मी अजून थकलेलो नाही, असं खक्कर म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा अभिनय सुरू केला. सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटासह अनेक गुजराती नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
अधिक वाचा : पुण्यात पाकिस्तानी तरुणाला अटक