ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वर्सोवा-वांद्रे सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास 28 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
-ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
-राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 210 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली.
-भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणे.
-महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित करणे.5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण वाढवणे. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ.
-असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ, करोडो कामगारांना लाभ मिळणार
-मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.
-पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
-मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
-राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
-सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन
-पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
-बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
-जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी खर्चास मान्यता
-राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. 4365 कोटी खर्चास मान्यता
-बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
-पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार








