वृत्तसंस्था / व्हिएन्ना
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इरेस्टी बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या तृतिय मानांकित अॅलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीत विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीतील सामन्यात व्हेरेव्हने जर्मनीच्या 18 वर्षीय जोयल स्वेझलरचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत स्वेझलरला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. हा सामना 40 मिनिटांत व्हेरेव्हने जिंकला. 2024 च्या टेनिस हंगामातील व्हेरेव्हचा हा एकेरीतील 60 वा विजयी सामना आहे. त्याचप्रमाणे इटलीच्या बेरेटेनी आणि कोबोली यांनीही चालु वर्षीच्या टेनिस हंगामात प्रत्येकी 60 सामने जिंकले आहेत.









