वृत्तसंस्था/ बर्लिन
एटीपी टूरवरील सुरू असलेल हॅले खुल्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर वेरेव्हने एकेरीत विजयी सलामी देताना ऑस्ट्रीयाच्या थिएमचे आव्हान संपुष्टात आणले.
विम्बल्डन स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पहिल्या फेरीतील सामन्यात वेरेव्हने थिएमचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. आता वेरेव्ह आणि कॅनडाचा शेपोव्हॅलोव यांच्यात दुसऱ्या फेरीचा सामना होईल.









