वृत्तसंस्था/ इंडियन्स वेल्स (कॅलिफोर्निया)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या बीएनपी पेरीबस महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या वयस्कर आणि अनुभवी व्हिनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. नाओ हिबीनोने व्हिनसचा पराभव केला.
गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत खेळताना व्हिनसला हार पत्करावी लागली. गेल्या 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत व्हिनसला मिनेनकडून सरळ सेट्समध्ये हार पत्करावी लागली होती. इंडियन वेल्स स्पर्धेतील पहिल्याच फेरीतील सामन्यात नाओ हिबीनोने व्हिनसचा 2-6, 6-3, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.
या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात पहिल्याच फेरीत टॉमस मॅचेकने स्वीसच्या वावरिंकांचा 7-6(7-3), 4-6, 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.









