मुंबई
व्हीनस पाइप्स आणि ट्युबस लिमिटेड यांचा समभाग सोमवारच्या सत्रात शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसला आहे. सदरचा समभाग जवळपास 21 टक्के इतका घसरला आहे. स्टेनलेस स्टीलच्या क्षेत्रातील या कंपनीच्या समभागाने 7 ऑक्टोबरला 1579
रुपये भावावर पोहचत सर्वकालीक उच्चांकी प्राप्त केली होती. सोमवारी हा समभाग 1245 रुपयांवर विक्रमी पातळीवर घसरताना दिसून आला.









