बेळगाव : इंटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव, आरएमआर स्पोर्ट्स अकादमी, बेळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित शटल स्मॅश 3.0 बॅडमिंटन स्पर्धेत मायरा हरगुडे, अनिका नायक, अर्णा असुंडी, समन्यू देशपांडे, नमन हसबे, नमन अणवेकर यांनी विजेतेपद मिळविले. तर दुहेरीत नमन हसबे आणि नमन अणवेकर, सिया मेहता आणि साची मेहता यांनी विजेतेपद पटकाविले. एकेरीमध्ये 11 वर्षांखालील मुलींच्या गटात मायरा हरगुडेने गहाना के.एस.चा 15-3 15-3, 13 वर्षांखालील अनिका नायकने सान्वी दलालचा 15-5 15-10, 15 वर्षांखालील अर्णा असुंडीने आस्था हुबळीचा 15-13 8-15 15-9, 17 वर्षांखालील अरणा असुंडीने आस्था हुबळी 15-10 8-15 15-8 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
महिला एकेरीत गेहनाने साची मेहताचा 10-15 16-14 9-15, तर महिला दुहेरी सिया मेहता आणि साची मेहता या जोडीने रिया आणि नम्रताचा 13-15 15-8 15-7, असा पराभव केला. मुलांच्या विभागात – 13 वर्षांखालील एकेरीत समन्यू देशपांडेने यशचा 15-8 15-9, 15 वर्षांखालील नमन हसबेने आयुष के.चा 15-2 15-8, 17 वर्षांखालील नमन अणवेकरने विद्या संकल्पचा 6-15 8-15, 17 वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत माहीम आणि यश या जोडीने नमन हसबे आणि नमन अणवेकरचा 8-15 14-15 असा पराभव केला. पुऊष एकेरीत माहीमने शशांक कित्तूरचा 8-15 12-15 असा पराभवक रत विजेतेपद पटकाविले. या खेळाडूंना मोहनदास रायकर आणि बेळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव आनंद हावण्णावर यांचे प्रोत्साहान तर प्रशिक्षक भूषण अणवेकर आणि वफा अन्वारी यांचे मार्गदर्शन लाभले.









