वृत्तसंस्था/सोलो (इंडोनेशिया)
2025 सालातील विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आशिया कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेला भारताने पहिल्या दिवशी शानदार विजयाने प्रारंभ केला. भारताच्या वेन्नाला, प्रणव आणि तन्वी रे•ाr यांनी एकेरीत विजयी सलामी दिली. महिला एकेरीत भारताच्या वेन्नाला कलागोटलाने पाठोपाठ दोन विजय नोंदविले. पहिल्या सामन्यात वेन्नालाने अलिसा कुलेशोव्हाचा केवळ 15 मिनिटांत 21-6, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाचा झेर्लिनाचा 21-18, 21-16 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले.
त्याचप्रमाणे भारताच्या तन्वी रे•ाrने चेऑक युंगचा 21-9, 21-10 असा पराभव केला तर द्वितीय मानांकित तन्वी शर्माने संयुक्त अरब अमिरातच्या वैदेही कालिदासनचा 21-6, 21-6 असा पराभव केला. पुरुष एकेरीमध्ये भारताच्या प्रणव नागलिंगाने मॅनमारच्या झुडीकाचा 21-15, 21-7 त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या अनिष नेगीने डिंग जीनचा 21-16, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव केला. दुहेरीमध्ये भारताच्या कलागोटला आणि रसिका यांनी व्हिएतनामच्या ट्रेन आणि अॅन यांचा 21-16, 21-14 तसेच दुसऱ्या एका दुहेरीच्या सामन्यात भारताच्या गायत्री आणि मानसा रावत यांनी अँड्री हेर्नाझे आणि मेरी युनटेल यांचा 21-17, 21-18 असा पराभव केला.









