नवी दिल्ली
लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सीडीज बेंझकडून कार्यकारी संचालकपदी व्यंकटेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. 1 जून 2022 पासून ते ही नवी जबाबदारी प्रत्यक्षात सांभाळणार आहेत. इलेक्ट्रिफिकेशन, डिजिटायझेशन व तंत्रज्ञान आधारित उत्पादनांच्या प्रक्रियेवर ते लक्ष ठेवणार आहेत. योजना, अभियांत्रिकी, दर्जा व पुरवठा साखळीशी संबंधित विविध विदेशातील कंपनीची कार्ये त्यांनी आजवर उत्तमपणे निभावली आहेत.