Vengurlet dt. Grand Narakasur Tournament on 23rd October
सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल व कुबलवाडा मित्रमंडळ, वेंगुर्ल यांच्यावतीने रविवार दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्रौ 8 वाजता भव्य नरकासुर स्पर्धा श्रीदेव रामेश्वर मंदिर समोरील वेंगुर्ले शाळा नं. 1 चे पटांगणावर सुरू होणार आहे.
ही नरकासुर स्पर्धा मोठा गट व लहान गट अशा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेतील मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रु. 7000/- रु. 5000/- रु. 3000/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु. 1000/- तर लहान गटातील प्रथम तीन क्रमांकास विजेत्यास रु. 3000/-, रु. 2000/-, रु. 1000/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु.500 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेतील मोठ्या गटासाठी 6 फूट व त्यावरील उंची असलेला नरकासुर तर लहान गटासाठी 5 फुट व त्या खालील उंची असलेला नरकासुर टाकाऊ पदार्थ पासून नरकासुर बनवण्याचे आहेत. या स्पर्धे संदर्भात अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी मोबाईल नं. 9423413775 यांच्याशी संपर्क साधावा. व नाव नोंदणी करावी. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी केले आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









