वेंगुर्ले (वार्ताहर)-
Vengurle No. Parishad to provide electric lighting for internal road traffic as well as suspension bridge -&. Manish Satardekar
वेंगुर्ले बंदरवरील झुलत्या पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करणे तसेच वेंगुर्ला शहरातील आंतरिक रस्त्यांची सुधारणा करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते अँड. मनीष वामन सातार्डेकर यांनी नगरपरिषरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचेकडे केली आहे.
वेंगुर्ले शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा ठरणारा वेंगुर्ला बंदर येथील झुलतापुल बऱ्याच प्रतिक्षेनंतर चालु वर्षी पुर्ण झालेला आहे. सदर पुलामुळे वेंगुर्लेच्या पर्यटनामध्ये भर पडलेली आहे. सदरचा पुल सध्याच्या घडीला आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. परंतु सदर पुलावर विद्युत रोषणाई नसल्यांने रात्रीच्या वेळी सदरचा झुलतापुल काळोखात असल्याने सदर पुलाचे सौदर्य रात्रीच्या वेळी पर्यटकांना पाहता येत नाही. त्यामुळे सदर पुलावर रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाई असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सदर पुलावर लवकरात लवकर विद्युत रोषणाई करावी तसेच वेंगुर्ले शहरातील आंतरीक कांही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सदर आंतरीक रस्ते खड्डेमय झालेले आहेत त्यामुळे सदर रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी जेणेकरुन वेंगुर्ले शहरात येणाऱ्या पर्यटकांना सदर आंतरीक रस्त्यावर फिरताना त्रास होणार नाही तसेच पादचारी व वाहन चालक यांची देखील गैरसोय होणार नाही. त्यामुळे सदरचे रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करावे .
वेंगुर्ले नगरपरिषदेने शहर सौंदर्यीकरण व शहर स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहराला सौंदर्यीकरणाच्या बाबतीत देशपातळीवर नावलौकिक मिळालेला असुन वेंगुर्ले शहरामध्ये पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये वेंगुर्ले शहरातील आंतरिक रस्ते व मुख्य रस्ते सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वेंगुर्लेच्या पर्यटनामध्ये मानाचा तुरा ठरणारा झुलतापुल आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सुशोभित करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी पावसाळ्यापूर्वी वेंगुर्ला शहरातील आंतरीक रस्त्यांची दुरुस्थी करावी व झुलत्या पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करावी. अशी मागणी वजा सुचना सामाजिक कार्यकर्ते अँड. मनीष वामन सातार्डेकर यांनी नगरपरिषरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचेकडे केली आहे.









