वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले राष्ट्रवादीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्यावतीने कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील अंगणवाडीच्या मुलांना खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, सचिव स्वप्नील रावळ, नितेश कुडतरकर, सुहास मांजरेकर, महेश वेंगुर्लेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेकानंद आरोलकर, मुख्याध्यापक प्रतिमा पेडणेकर यांसह अन्य शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांनी शरद पवार यांच्या कार्याची माहिती दिली, तर खेळाचे साहित्य दिल्याबद्दल मुख्याध्यापक पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









