कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्या वतीने होम मिनीस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम
वेंगुर्ले(वार्ताहर)-
कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ वेंगुर्ले यांच्यातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनीस्टर पैठणीचा स्पर्धेत मानसी मंगेश पालव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ वेंगुर्ले यांच्यातर्फे आयोजित केलेल्या होम मिनीस्टर खेळ पैठणीचा स्पर्धेत २८ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामदास पारकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत व्दीतीय क्रमांक मनाली गिरीष जगताप, तृतीय क्रमांक सुहानी सुहास परब, उत्तेजनार्थ क्रमांक रिया टेमकर, राणी पाटकर, मेघना राऊळ, संगिता निनावे, प्रज्ञा सावंत, कविता नाईक, सेजल गावडे, सानवी गावडे, रसिका पालकर, प्रगती गावडे यांनी पटकाविले.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला उमेश येरम, रेश्मा परब, शिला परब, वेदिका परब, रंजना वालावलकर, विद्या परब, निलम वराडकर, हर्षदा वालावलकर, अन्वी शिरोडकर, मनिषा मेस्त्री, सुरेखा वालावलकर, आरती वालावलकर, सिध्दी वालावलकर, प्रेरणा राऊळ यांच्या हस्ते संपन्न झाला.









