२०० रुग्णांनी घेतला लाभ ; सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीराचे आयोजन
वेंगुर्ले(वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेना यांच्यावतीने व आरोग्य विभागाच्या सहकार्याने सिंधुदुर्ग शिवसनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरांत 42 जणांनी रक्तदान तर, मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा 200 रुग्णांनी लाभ घेतला.
आपल्या भागात सर्वसामान्यंसह सर्वानाच कमी खर्चात चांगली आरोग्य सेवा मिळाली अशी सर्वाचीच अपेक्षा असते हि अपेक्षा कांही नियम व तांत्रिक कारणांमुळे शासकिय रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस यांनी पुर्ण करताना अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी आपण शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री या जिल्ह्याचे पालक मंत्री, उद्योग मंत्री व याज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे प्रयत्न करीतच आहे. पण तात्पुरत्या स्वरूपांत सामाजिक सेवा म्हणून रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन करून सर्व सामान्यांना आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम राबविला आहे. शासकिय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजाला आरोग्य सेवा देण्यासाठी असे उपक्रम राबवावेत. कार्मिस आल्मेडा हे प्रामाणिक समाजसेवा करीत आहेत. त्याप्रमाणे इतरांनीही असे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करावेत त्यासाठी लोकप्रतिनीधीच करू शकतात असे नाही तर मनांत ठरविले तर आपल्यातील अनेक व्यक्ती असे उपक्रम राबवू शकतात. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग शिवसनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेना यांच्यावतीने व आरोग्य विभागाच्या सहकायनि सिंधुदुर्ग शिवसनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन सिंधुदुर्ग शिवसनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचे हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. संदिप सावंत, डॉ. सुबोध इंगळे, शिवसनेचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, सुनिल मांजेरकर, सचिन देसाई, तालुका संघटक बाळा दळवी, वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम, युवक शहर प्रमुख संतोष परब, डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, डॉ. स्वप्नाली माने-पवार, डॉ. श्री. पी. डी. वजराटकर, डॉ. श्याम राणे, माजी जि.प. सदस्य नितीन शिरोडकर, दोडामार्गचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी शिवसेना कार्यालयातील व्यवस्थापक गजानन नाटेकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, कौशिक परब, मितेश परब, वेंगुर्ले शहर महिला संघटक अँड श्रध्दा बावीस्कर, सायली परब, शबाना शेख, अण्णा वजराटकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, डॉ, चेतन चुबे यांसह जिल्हा रूग्णालय ओरोस व उपजिल्हा रूग्णालय वेंगुर्लेमधील नर्सेस व अन्य स्टाफ, ओरोस रक्तपेढीचे कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात महिलांची तपासणी ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी, डोळे तपासणी, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदाब तपासणी, कान, नाक, घसा तपासणी आदींची तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री PMJAY कार्डची मोफत नोंदणीही करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बाळा दळवी, उपस्थित मान्यवरांचे स्वागत नितीन मांजरेकर उमेश येरम यांनी केले. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना नितीन मांजरेकर पुरस्कृत ‘अक्कलकोट स्वामी’ चा फोटो असलेली ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.









