वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले येथील बहुसंख्य विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात, खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करीत कालवीबंदर विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली . भर पावसातून आलेल्या या दिडीचे मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले.
वै.श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये यांच्या प्रेरणेने सुरू झालेली विठुरायाची पायीवारी गुरुवारी देवशयनी आषाढी एकादशी दिवशी सलग चौथ्या वर्षीही त्यांच्या मित्र परिवारांच्या सहकार्याने प्रति पंढरपूर असलेल्या केळूस-कालवीबंदर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात नेण्यात आली. या वारीत बहुसंख्य पुरुष व महिला विठ्ठल भक्त सहभागी झाले होते. पांडुरंगाच्या कृपेने जेवढी वर्षे पायीवारी करणे शक्य आहे तेवढी वर्षे पायीवारी चालू ठेवण्याचा बाबू झांट्ये ह्यांच्या मित्रपरिवारांचा मानस आहे. सुमारे १८ किलोमीटरचा हा पायी प्रवास करून सहभागी झालेल्या भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









