चाळण झालेल्या फोर्ट रोडवरून वाहनधारकांची कसरत
प्रतिनिधी/ बेळगाव
तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद झाले. परंतु, पर्यायी मार्गांवर प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच फोर्ट रोडवर ठिकठिकाणी पडलेल्या ख•dयांमुळे वाहने कशी चालवायची? असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे. रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करूनच गेट बंद केले असते तर योग्य ठरले असते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
10 मार्चपासून नैर्त्रुत्य रेल्वेने तानाजी गल्ली रेल्वेगेट वाहतुकीसाठी कायमस्वरुपी बंद केले. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी एक तर कपिलेश्वर उ•ाणपूल अथवा जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उ•ाणपुलाचा वापर करावा लागत आहे. परंतु, या दोन्ही उ•ाणपुलांचे सर्व्हिस रोड अतिशय अरुंद आहेत. सर्व्हिस रोडवर ख•s पडले असून काँक्रिटचे लोखंडी बार बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत वाहने चालवायची कशी? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
जिजामाता चौक ते देशपांडे पेट्रोलपंपपर्यंतच्या फोर्ट रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठे ख•s पडले आहेत. या ख•dयांमुळे परिसरातील व्यापारी वैतागले आहेत. या ख•dयांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. मागील पावसाळ्यात काही ख•dयांमध्ये तात्पुरती मलमपट्टी करत पेव्हर्स बसविण्यात आले. शहराच्या ज्या भागात जास्त वाहतूक नाही, त्या भागात दर दोन वर्षांनी डांबरीकरण होते. परंतु, रहदारीच्या फोर्ट रोडवर मात्र अनेक वर्षे मागणी होऊनदेखील डांबरीकरण केले जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
फोर्ट रोडवर अनेक ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, तसेच वाहन दुरुस्ती दुकाने आहेत. त्यामुळे बेळगावसह बाहेरच्या नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते. परंतु, सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था याचा परिणाम व्यापारावरही होत असल्याने रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी होत आहे.









