लोणावळा : गणेश उत्सवाच्या निमित्त कोकण भागात जाणारे भाविक भक्त तसेच कोल्हापुर, सांगली, सातारा भागात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने खाजगी प्रवासी वाहनांमधून मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी निघाल्याने रात्रीपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस
वेवरील वाहनांचा वेग खंडाळा घाटात मंदावला आहे. पुणे लेनवर आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यान घाट भागात वाहनांची गर्दी झाली असून मंद वेगाने वाहने पुढे सरकत आहेत. खंडाळा घाटातील ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलीस व बोरघाट पोलिसांची टिम महामार्गावर वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहे. मात्र वाहनांची संख्याच जास्त असल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
गणेश भक्तांना टोलनाक्यावर टोलमाफी
गणेश उत्सवानिमित्त गावी निघालेल्या गणेश भक्तांना टोलनाक्यावर टोलमाफीची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून पोलीस ठाण्यामधून प्रवासी प्रवास दिले जात आहेत. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देखील हे पास उपलब्ध असून गावाकडे जाणार्या गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा.








