बायथाखोल बोरी येथील घटना : प्राणिमित्र व युवकांच्या सतर्कतेमुळे गोमांस तस्कारांचा पर्दाफाश,आशय कोरडे यांचे धाडस कौतुकास्पद
फोंडा : गोहत्येनंतर गोमांसाची बनावट कागदपत्रासह अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बोरी येथील प्राणिमित्र युवकांनी महत्वाची भूमिका बजवाली आहे. विनापरवाना बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला बायथाखोल बोरी सर्कलजवळ पकडून फोंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कारवाई करताना वाहनचालकांसह तिघांजणावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. वाहनचालक फैजल मुनाफ बेपारी (27, बाणावली सासष्टी), साथीदार अल्फाझ बेपारी (32, बेळगांव), वाहनमालक रिहास अहमद बेपारी (बाणावली) अशी त्याची नावे आहेत. सदर घटना काल रविवारी दुपारी 11.30 वा. सुमारास घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेबाबत प्राणिमित्र आशय कोरडे यांनी रितसर तक्रार नोंदविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बायथाखोल बोरी सर्कलवर टाटा येस जीए 08 यू 5112 वाहन संशयास्पद म्हणून वाहतूक पोलिसांतर्फे अडविण्यात आले होते. कागदपत्राची तपासणी केल्यानंतर सामान जादा असल्याच्या कारणावरून वाहनचालकाला चलन फाडून सदर प्रकार संपविण्यात आला होता. यावेळी सदर डोळ्यादेखत घडलेल्यानी येथील युवकांना संपुर्ण प्रकार संशयास्पद आढळल्dयाने त्यांनी वाहतूक पोलिसांना जाब विचारला व वाहनात संशयास्पद सामान असल्याचे सुचित केले. त्यावर वाहतूक पोsिलसांनीही प्रथमदर्शनी काणाडोळा केला. त्यानंतर पोलीस स्थानकांशी संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानंतर फोंडा पोलिसांशी संपर्क साधून वाहन जत्प करण्यात आले. सर्व युवकांनी आपला मोर्चा फोंडा पोलीस स्थानकांशी वळविल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
आशय कोरडेच्या धाडसामुळे गोमांस तस्करीचा पर्दाफाश
आशय कोरडे हा युवक बोरी येथील एका महाविद्यालयात शारीरिक शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. प्राण्याबद्दल त्याला भुतदया आहेत. जखमी गुरांना ध्याय फाऊंडेशनच्या गोशाळेत सुखरूप पोचविण्याचे उपक्रम तो कोणतीही प्रसिद्धीविना सतत करीत आहे. बेकायदेशीरित्या गोमांसाची वाहतूक करणारे अनेक वाहने दिसतात. काहीवेळा वाहतूक पोलिसांनीही सदर प्रकार नजरअंदाज करतात. मोले चेकनाक्यापासून या बेकायदेशीर कृत्यांना अभय मिळालेले आहे. फोंडा पोलिसांनी जेव्हा याप्रकरणी रितसर तक्रार देण्याची मागणी केली तेव्हा आशयने दाखविलेल्या धाडसामुळे गोमांसाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे. कर्नाटक येथून केवळ 180 किलो गोमांसाची वाहतूक करण्यात येत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आलेले आहे. मात्र प्रत्यक्ष वाहनांमध्ये हजारो किलो गोमांस जनावरांची कातडे, हाडे, मुंडक्या असल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झालेले आहेत.
मोले चेकपॉस्टवरून वाहन सहीसलामत कसे सुटले?
कर्नाटक येथून गोमांसाची वाहतूक शितगृह असलेल्या वाहनातून करण्यात येत होती अशी माहिती चालकांने दिली आहे. त्यानंतर गोव्यातील विविध भागात रवानगी अन्य वाहनातून होत असते. मध्येच वाहन बंद पडल्याने आपली वर्णी लागली असल्याची कबूली चालकांनी दिली आहे. बोरी येथील सतर्क नागरिकांमुळे खाण्यायोग्य नसलेल्या गोमांस वाहतूक करणाऱ्यांना अद्दल घडली आहे. तरीही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत. सदर वाहन मोले येथील चेकपॉस्टावर तैनात असलेल्याकडून रक्षकाच्या स्कॅनरमधून सुटते कसे ? यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहतूक पोलिसांनी कोणतीच कारवाई का केली नाही
पशुसंवर्धन खात्याची डॉक्टरांनी सदर गोमांसाची साठवणूक कागदोपत्रात नमूद केलेल्या वजनाप्रमाणे आहे की नाही याची कुठलीही पडताळणी केलेली नाही. गोमांस केवळ म्हशीचे मांस असून सद्यपरिस्थितीत मूळ घटनास्थळावरून 18 तासाहून जास्त उलटल्यामुळे ते खाण्यायोग्य नसल्याचा शेरा मारला. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करताना वाहनाचालक, वाहनमालक व अन्य मिळून एकूण तिघाजणांवर अस्वच्छ स्थितीत, बनावट कागदपत्रासह गोमांसची वाहतूक करणे, प्राणी व्रुरता प्रतिबंध कायद्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.









