वार्ताहर /जुने गोवे
जुने गोवे चर्च परिसर म्हणजे देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण.कोविड मुळे गेली जवळजवळ दोन वर्षे या ठिकाणी पर्यटकांची संख्या रोडावली होती. पण सध्यस्थितीत कोविडचे नियम शिथिल झाल्या ने हळूहळू मोठय़ा संख्येने पर्यटक जुन्या गोव्यात येत आहे. त्या मुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर्चेस आहेत. मधून जाणारा रस्ता, राज्य महामार्गाचाच एक भाग. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन म्हणून ठळक अक्षरांतील लावलेले फलक शिक्षीत पर्यटकांना निश्चितच दिसतात. तरीसुद्धा गांधी सर्कल ते रायबंदरच्या बाजूस टोकापर्यंत संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूला पर्यटकांची वाहने पार्क केलेली असतात.यामुळे बहुतेक वेळा या भागात वाहतुकीचा खेळखंडोबा होतो व वाहने अडकून पडतात. अशावेळी वाहतूकीत सुसूत्रता आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची या ठिकाणी नितांत गरज आहे. कधी कधी वाहतूक पोलिस असुनही, नसल्यासारखीच परिस्थिती येथे असते. तरी येथे असणारया वाहतूक पोलिसांनी कडक धोरण स्वीकारुन पर्यटकांना आपलीं वाहने योग्य ठिकाणी पार्क करण्याची सक्ती करावी व वाहतूकीचा रस्त्यावर मधोमध बोजवारा उडणार नाही याची काळजी घ्यावी.









