खानापूर तालुक्यातील खैरवाड येथील 10 जण जखमी
खानापूर : तालुक्यातील खैरवाड येथील वारकरी आणि काही भक्तमंडळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रविवारी रात्री पंढरपूरकडे रवाना झाले होते. सोमवारी पहाटे चार वाजता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सांगोल्याजवळील पुलाच्या कठड्याला क्रुझरची जोरात धडक बसली. यात क्रुझरमधील 11 जण जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. शंकर मंडोळकर, रुद्राप्पा भुजगुरव, जोतिबा वाकले हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पंढरपूर येथील हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले आहे. तर यल्लारी गुरव, तानाजी झुंजवाडकर, कीसन भुजगुरव, विठ्ठल कोलेकर, माणिक कोलेकर, आजोबा सागरेकर, परशुराम नाळकर, रेमाणी बस्तवाडकर या जखमींना सांगोला स्पंदन इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. त्यानंतर नागाप्पा भुजगुरव प्रवीण कोलेकर, गौराप्पा गुरव, रुक्मिणा जुंजवाडकर हे सर्वजण अपघाताची ऊर्जा समस्त सांगोला येथे पोहोचले. त्यांनी जखमींची विचारपूस करून सांगोला येथील सर्व आठ जखमींना उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर पंढरपूर येथील लाईफ लाईन या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची नोंद सांगोला पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.









