सोलापूर :
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची तात्काळ विक्री, योग्य दर मिळावा आणि व्यापारी व कर्मचाऱ्यांचे पहाटे होणारे हाल टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला लिलावाची वेळ बदलण्यात आली आहे. गुरुवारपासून दररोज सायंकाळी ६.३० वाजता भाजीपाला लिलाव सुरू होणार आहेत.
या नव्या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या लिलावाची सुरुवात खुद्द माने यांनीच केली. या निर्णयाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी भाजीपाल्याला चांगले दर मिळाले.
पहिल्याच दिवशीचे दर:
-
मेथी – ₹२५ प्रति पेंडी
-
भुईमूग – ₹५२ प्रति पेंडी
-
टोमॅटो – ₹२४ प्रति किलो
-
दोडका – ₹३५ प्रति किलो
-
कोथिंबीर यासारख्या भाजीपाल्यालाही चांगले दर मिळाले.
या उद्घाटनप्रसंगी उपसभापती सुनील कळके, संचालक सुरेश हसापुरे, नागण्णा बनसोडे, अविनाश मार्तंडे, प्रथमेश पाटील, सचिव अतुल रजपूत, तसेच आप्पासाहेब काळे, आप्पासाहेब कोरे, शिवाजी घोडके पाटील, कविता घोडके पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी यांना अधिक सोयीचे वेळापत्रक मिळणार असून बाजार व्यवहार अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








