कसबा बीड/ प्रतिनिधी
Kolhapur News : कसबा बीड ता. करवीर हे सोन्याचा पाऊस पडणारे गाव असा उल्लेख करवीर काशी ग्रंथात आहे.याचा प्रत्यय नेहमीच सुवर्ण मुद्रा प्रतिवर्षी गावातील शिवारात नागरिक-महिलांसह अनेकांना सापडली आहेत. सापडलेत्या सुवर्णमुद्रा आपल्या घरातील देवघरात पुजल्या जातात.सोन्याच्या मुद्रा व नाणी सापडलेल्या ताज्या घटना आहेत,अशी अनेक उदाहरणे वास्तवात सत्य असतानाच इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीच्या काळातील चांदीची नाणी ही येथील चर्चजवळ सापडणे अशा वारंवार घटना घडल्या आहेत.तसेच या कसबा ठिकाणी गावात शेतशिवारात जमिनीत गाढलेल्या अवस्थेतील,अनेक वीरगळ सापडतात.म्हणूनच बीड हा वीरगळ ठेवा असणारे गाव असे संबोधले जाते.
काल तुळशी नदीच्या पात्रात पाणी कमी झाल्याने नदीत एक वीरगळ नव्याने सापडली आहे. या वीरगळावर फक्त शिवपुजेचा भाग असून त्याच्या खालील भागावर कोणतेही कोरीव काम आढळत नाही.या वीरगळासह गावातील एकूण वीरगळांचा आकडा २०३ वर पोहोचला आहे.या वीरगळ शिवाय इतरही अनेक अवशेष कसबा बीडमध्ये पहायला मिळतात.

सापडलेले सर्व वीरगळ यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड यांनी येथील कलेश्वर (बीडेश्वर-महादेव) मंदिरात विस्थापित केले आहेत. या वीरगळावरती अनेक देवी देवतांच्या कोरीव लेण्यासह अनेक पुर्वीच्या लढाईत शहीद झालेल्या मुख्य सेनापती,सरदार ,सैनिक यांची त्याकाळातील अवशेष (क्षणचित्रे) कोरलेली आढळून येतात.सातत्यांने यंग ब्रिगेड सुवर्णराजधानीचे संशोधक कार्यकर्ते,सुरज तिबिले यांच्यासह अनेक तरुण एकत्र येऊन ‘ठेवा इतिहासाचा,ध्यास संवर्धनांचा ‘ याला अनुसरून सामाजिक काम करत आहेत.









