वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील स्प्रिंगफिल्ड येथे झालेल्या सेंट जेम्स खुल्या पीएसए कॉपर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या वीर छोत्राणीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात मेक्सिकोचा टॉपसिडेड स्क्वॅशपटू लिओनेल कार्डेन्सने वीर छोत्राणीचा 13-11, 4-11, 11-4, 11-3 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. छोत्राणीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.









