गारगोटी प्रतिनिधी
गारगोटी कोल्हापूर रस्त्यावर मडिलगे बुच्या बस स्टॉप नजीक वेदगंगा नदीचे पाणी रस्त्याच्या पातळीबरोबर आले आहे.पावसाचे जोर कमी झालेला असुन रात्री तीननंतर पाणी गारगोटी कोल्हापूर या मुख्य रस्त्यावरील आलेले आहे मात्र पाणी कमी असल्याने वाहतूक सुरू आहे
खबरदारीचा उपाय म्हणून मडिलगे ग्रामपंचायत कडून सुरक्षा बरेकटस उभा केलेले असुन ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस ठिय्या मारुन आहेत, सकाळपासून पावसाने उसंत घेतली असुन सुर्याने ही दर्शन दिलेले आहे. नवीन रस्ता झाला परंतु पुर आल्यास पाणी जाणेस वाट नसल्याने सातत्याने येथे पाणी रस्त्यावर येत असते मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केलेला आहे.
म्हसवे नजीक ची मोरओहोळ सुध्दा तुडुंब भरून वाहत आहे तर दारवाड येथील पेट्रोल पंपानजीकच्या ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने भुदरगडातून कोल्हापूर कडे जाणारे दोन्ही रस्त्यावरील वाहतूक पाण्यातूनच सुरू आहे. पाटगाव, चिकोत्रा, बारवे दिंडेवाडी, फये आदी धरण परिसरात पावसाचे सातत्य कायम असुन आकुर्डे,म्हसवे,निळपण,वाघापुर बंधारे आजचा सातवा दिवस पाण्याखाली गेलेले आहेत.









