मुंबई
वेदांता लिमिटेड या कंपनीचे समभाग शेअरबाजारात मंगळवारी जवळपास 6 टक्के घसरणीत असताना दिसले. समभाग 6 टक्के खाली येत 269 रुपयांवर भाव आला होता. वेदांताचा समभाग हा सलग आठव्या सत्रात घसरणीत राहिला असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 14 टक्क्यापर्यंत समभागाचा भाव घसरला आहे. विदेशातील मालमत्ता विकण्याच्या कंपनीच्या इराद्याबाबत सरकार नाराज असल्याचे बोलले जात आहे.









