लंडनमधील 100 वर्षे जुना स्टुडिओ घेतला अग्रवाल यांनी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वेदांत समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी लंडनमधील प्रतिष्ठित रिव्हरसाइड स्टुडिओ विकत घेतला आहे. यांची घोषणा कंपनीने बुधवारी एका प्रेस रिलीजमध्ये केली. रिव्हरसाइड स्टुडिओ लंडनच्या मध्यभागी थेम्स नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. हा स्टुडिओ कलेसाठी एक प्रसिद्ध जागतिक केंद्र म्हणून ओळखले जात असे. आता हा 100 वर्षे जुना स्टुडिओ अनिल अग्रवाल रिव्हरसाइड स्टुडिओ ट्रस्ट या नावाने चालवला जाणार असल्याची माहिती आहे. अनिल अग्रवाल म्हणाले, ‘मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की कलेत सीमा ओलांडण्याची, लोकांना एकत्र करण्याची आणि मानवी अनुभव उंचावण्याची शक्ती आहे. रिव्हरसाइड स्टुडिओ भारतीय आणि जागतिक कला आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी एक प्रमुख जागतिक ठिकाण बनेल.’
कलाकारांसह चित्रपट बुंधुंना आमंत्रित करतो : अनिल अग्रवाल
मी भारतीय कलाकारांना आणि चित्रपट बंधुंना या जगप्रसिद्ध ठिकाणी त्यांची कलात्मक प्रतिभा आणि चित्रपटाची खोली दाखवण्यासाठी आमंत्रित करतो. जेणेकरून हा खरोखरच समृद्ध करणारा अनुभव बनू शकेल. विविध क्षेत्रातील जागतिक नेत्यांना आता येथे प्रेक्षकांना त्यांच्या वास्तविक जीवनातील अनुभवांनी आणि प्रवासांनी मंत्रमुग्ध करण्याची संधी आहे, असे वेदांत ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे. रिव्हरसाइड स्टुडिओ लंडनच्या मध्यभागी थेम्स नदीच्या उत्तर तीरावर स्थित आहे. स्टुडिओ सिनेमॅटिक प्रदर्शनासह त्याचा वारसा साजरा करेल. हा प्रयत्न अग्रवाल यांचा सर्जनशीलतेला वाव देणारा आहे.









