Mumbai: वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलं आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंबईत युवासेनेने सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीनं मंत्रालयाबाहेर हे आंदोलन केलं. आंदोलनाआधी मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरु आहे. यावेळी हातामध्ये लाॅलीपाॅप घेऊन राज्यसरकारचा निषेध केला.
“मोदी ने क्या दिया? लॉलीपॉप लॉलीपॉप” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्या दिवशी भाजप सरकार विरोधात पुण्यात आंदोलन सुरू असून या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेदेखील सहभागी आहेत. तर युवासेनेने मुंबईत सरकारच्या विरोधात आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
कोल्हापुरात निषेध स्वाक्षरी मोहिम’आंदोलन
खोकेबाज सरकारने काळा दिवस आणला, चार लाख लोकांचे तळतळाट त्यांना लागणार. ज्या पध्दतीने लहान मुले चोरणारी अंजना बाईची अवस्था झाली तशीच या सरकारची अवस्था होणार. वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प शिंदे -भाजपा सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला. दीड लाख कोटींच्या आसपासची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प होता. यामुळे १ लाखांच्यावर तरुणांचा रोजगार जाऊन महाराष्ट्रातील युवा वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे म्हणून आज याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा व शहर युवासेनेतर्फे खरी कॉर्नर चौक शिवाजी पेठ येथे राज्य सरकारचा निषेध करन्यात आला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या युवकांच्या स्वाक्षरी घेऊन गुजरात मध्ये गेलेला प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा यासाठी आज निषेध – स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली. यावेळी युवासेना -युवतीसेना तसेच सर्वच युवक यांच्या वतीने कडकडून निषेध करण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








