महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धा ; ९ डावात घेतले २३ बळी
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्गचा सुपुत्र वेद शिवदास मळीक याने गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे . त्याने नऊ डावात 23 गडी बाद केले. आता तो महाराष्ट्र संघात निवडीसाठी सज्ज झाला आहे. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. मजुरांच्या मुलाने कठोर मेहनत करुन ही नेत्रदीपक कामगिरी केली. वेद शिवदास मुळीक हा इन्सुली येथील एस . आर . आय क्रिकेट अकादमीचा खेळाडू असून त्याचे प्रशिक्षक भारत गरुडकर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेद जलदगती गोलंदाजी करत आहे. औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा झाली. त्यात सिंधुदुर्ग संघातून वेद शिवदास मळीक खेळला. गोलंदाजीत त्याने 2.41 च्या इकॉनॉमि रेटने 23 गडी नऊ डावात बाद केले . डावखुरा जलदगती गोलंदाज असलेल्या वेदने जबरदस्त कामगिरी करुन महाराष्ट्र संघात जाण्याच्या आशा पल्लवित केल्या. त तो इन्सुलीच्या एस.आर. आय. अँकडमीचे प्रशिक्षक भारत गरुडकर याच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजी करतो. त्याचे गरुडकर, राकेश बोकाडे, पुष्पा बोकाडे, राधा बोकाडे, रुकसाना खान, शामल मळीक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वेद सावंतवाडी उभा बाजारचा रहिवासी आहे.









