सावंतवाडी प्रतिनिधी
शिवसेनेच्या ओबीसी सेल विभागाच्या तालुकाप्रमुखपदी माडखोल येथील वासुदेव अशोक होडावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीपत्र तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या सहीने आज देण्यात आले . यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणेंनी स्पष्ट केले की सावंतवाडी तालुक्यात ओबीसी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना एकत्रित करून शिवसेनेच्या झेंड्याखाली त्यांच्या समस्या व अडचणी निश्चितपणे सोडवण्यासाठी नव्याने नियुक्त केलेले तालुका प्रमुख वासुदेव होडावडेकर प्रयत्न करतील . आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बळकट केली जाईल असे स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात नवनियुक्त ओबीसी सेलचे तालुकाप्रमुख श्री होडावडेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे ,गजानन नाटेकर, तालुका संघटक संजय गावडे, रवींद्र परब, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष गुंडू जाधव,उपविभाग प्रमुख संजय पालकर ,माजी सैनिक संघटनेचे शशिकांत गावडे, विशाल बांदेकर , पप्या सावंत, तळकट माजी सरपंच रामा सावंत,महादेव राऊळ उपस्थित होते . यावेळी वासुदेव होडावडेकर यांनी स्पष्ट केले की ,ओबीसी समाजाला एकत्रित करून शिवसेना पक्ष अधिक बळकट केला जाईल. निश्चितपणे आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल. आमच्या ओबीसी समाजाच्या समस्या निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख तथा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच सोडवू शकतात याची खात्री झाली आहे . त्यामुळे आम्ही सर्वजण एक संघपणे काम करणार आहोत. गावागावात दौरे करून ओबीसी यांचा लवकरच मेळावा घेतला जाणार आहे असे होडावडेकर यांनी स्पष्ट केले .









