ओटवणे । प्रतिनिधी
आरोंदा बाजारपेठेतील बालाजी हार्डवेअर या दुकानाचे मालक तथा आरोंदा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष वासुदेव शांताराम डुबळे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आरोंदा – किरणपाणी पुल परिषदेचे ते अध्यक्ष होते. या पुलासाठी सर्वांना सोबत घेत त्यांनी दिलेले योगदान सर्वज्ञात आहे. आरोंदा बाजारपेठेतील हितासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत डुबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. आरोंदा येथील बालाजी हार्डवेअरचे मालक सिद्धार्थ आणि ऋषिकेश डुबळे तसेच पुणेस्थित प्रा विनय डुबळे यांचे ते वडील होत. तसेच सातेरी मेडिकलचे मालक तात्या डुबळे, शांताराम ट्रेडर्सचे मालक रघुवीर डुबळे, सावंतवाडी येथील फटाक्यांचे प्रसिद्ध व्यापारी कै श्रीकृष्ण डुबळे यांचे ते भाऊ होत तर कुडाळ येथील माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ शिरसाट यांचे ते मेव्हणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन भाऊ, तीन बहिणी, भावजय, भावोजी, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









