सातार्डा –
सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा आदिस्थान वास्तू शुद्धीकरण सोहळा रविवार दि 29 डिसेंबर रोजी होणार आहे.ब्राह्मणवृंदाकडून विधिवत श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचे आदिस्थान वास्तू शुद्धीकरण करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9 वाजता सोहळ्याला सुरुवात होणार आहे.यनिमित्त लघुरुद्र, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद होणार आहे. उपस्थित रहाण्याचे आवाहन ज्ञानदीप राऊळ व कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Previous Articleकुंडल बाजारपेठेत चोरट्यांचा धुमाकूळ
Next Article जमत नसेल तर स्वेच्छानिवृत्ती घ्याः मुश्रीफ









