शिक्षक दिनानिमित्त दि. 5 रोजी कला अकादमीत होणार वितरण
पणजी : शिक्षक दिनानिमित्त येत्या शुक्रवार दि. 5 सप्टेंबर रोजी वशिष्ठ गुरु पुरस्कार शिक्षण खात्यातर्फे देण्यात येणार असून तो कार्यक्रम सकाळी 11 वा. पणजीतील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एकूण 10 शिक्षकांना सदर पुरस्कार मिळणार आहे.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : प्राथमिक शिक्षक गट-छाया वैजनाथ बोकाडे (विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा विठ्ठलपूर-सांखळी), कमलाकर विश्वास देसाई (गावठण, पिळये धारबांदोडा). माध्यमिक शिक्षक गट-मंजिरी दत्तप्रसाद जोग (केशव सेवा साधना विशेष मुलांची शाळा, सर्वण-डिचोली), राजमोहन रामनाथ शेटये (व्हायकाऊंट पेडणे हायस्कूल नानेरवाडा-पेडणे), कालिदास सातार्डेकर (कामिलो परेरा, सरकारी हायस्कूल, सदर-फोंडा), ममता तातोबा पाटील (आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूल, करंजाळ-मडकई).
माध्यमिक शाळा : मुख्याध्यापक गट-गुरुदास पालकर (ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा), अरोरा डिसोझा (रोझरी हायस्कूल, नावेली-मडगाव). उच्च माध्यमिक शिक्षक गट-सुनिल जगन्नाथ शेट (दीपविहार उच्च माध्यमिक शाळा, हेडलॅण्ड सडा -वास्को). उच्च माध्यमिक प्राचार्य गट-सिंथिया मारिया बोर्जेस (आरएमएस हायर सेंकडरी स्कूल, कोंब-मडगाव). मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते वरील सर्व शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.









