वाहतूक सोयीसाठी ग्रामस्थांनी घेतले पुढाकार; रेल्वे उड्डाणपूल सुरु
सांगली : उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला नांद्रे-वसगडे नवा रेल्वे उड्डाणपूल माजी खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक, ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी वाहतूकीसाठी खुला केला. यामुळे नांद्रे, वसगडे परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.
हा रेल्वे उड्डाणपूल तयार होवूनही तो वाहतुकीस खुला केलेला नव्हता. रेल्वेचे अधिकारी तांत्रिक कारणे देत विलंब करत होते. काहींनी उद्घाटनाचे कारण सांगून उड्डाणपूल बंद ठेवला होता. मात्र, त्यामुळे शेतकरी व स्थानिकांसोबतच प्रवाशांची गैरसोय होत होती.
ग्रामस्थ स्थानिक कार्यकर्त्यांनी सोमवारी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. स्थानिकांची व प्रवाशांची सोय महत्वाची आहे, त्यामुळे हा रेल्वे उड्डाणपूल सुरू करण्याच्या सूचना संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला. याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला.








