क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील वसंतराव पोतदार अभियांत्रिक महाविद्यालयाच्या आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
महाविद्यालयाच्या मैदानावरती आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीदेवी मालाज, क्रीडा समन्वयक प्रा. प्रतिक लोहार व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. श्रीदेवी मालाज यांच्याहस्ते 100 मी. धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात करुन उद्घाटन करण्यात आले. 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये आदर्श कडाळीकर तर मुलींमध्ये निगार सुलताना यांनी प्रथम क्रमांक, 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत राज कुंदर व तेजस्वीनी लोहार यांनी प्रथम, 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत श्रीजीत कानशिंदे व तेजस्वीनी लोहार यांनी प्रथम. गोळाभेकमध्ये ऐश्वर्या कुरणगी व सोहम मेणसे यांनी प्रथम, भालाफेक स्पर्धेत चारुदत्त पाटील व धनश्री पोटे प्रथम, थाळीफेकमध्ये ऐश्वर्या पुरगी व चारुदत्त पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वसंतराव पोतदार महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.









