छात्रप्रबोधन मंडळ व नामदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सामाजिक सांस्कृतीक व साहित्य क्षेत्रात अखंड उत्कृष्ठ योगदान दिलेल्या शिक्षकांस आजी-माजी कै. वसंतराव गोविंद शेठ केसरकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सुरेश ठाकूर यांना जाहीर झाला आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यंदाचा हा पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरा गावचे सुपुत्र सुरेश श्यामराव ठाकूर यांना संस्थानचा वतीने जाहिर करण्यात आला आहे. सुरेश ठाकूर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक ते केंद्रप्रमुख अशी चाळीस वर्षे आदर्श सेवा केली असून अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे ते अध्यक्ष असून कोमसाप शाखा मालवणचे ही विद्यमान अध्यक्ष आहेत शतदा प्रेम करावे! व सिंधु साहित्य सरिता या दोन पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या दैनिकांमधून सातत्याने लेखन केले आहे.
मुंबई दूरदर्शन केंद्रावरुन कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावर अनेक कार्यक्रम सादर केले. आहेत. त्याच प्रमाणे त्यांना साने गुरुजी कथामालेच्या वतीने त्यांनी विविध बालनाटय शिवीरे, व्यक्तिमत्त्व, विकास शिविरे व लेखन कार्यशाळा आयोजित करून नवोदितांना साहित्य लेखनाची प्रेरणा दिली आहे.
कोमसाप शाखा मालवण च्या वतीने विविध नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम ते आजही ते पुरस्काराने राबविले आहेत. त्यांच्या अशा सामाजिक, साहित्यीक, सांस्कृतीक, शैक्षणिक कार्याचा विचार करून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रुपये पाच हजार असे आहे. असे निवड समितीने जाहीर केले आहे छात्र प्रबोधन मंडळ व दिपकभाई मित्र मंडळ सावंतवाडी तर्फे लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.









