Salman Khan : सलमान खान आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच अभिनेता वरुण धवनने सलमानबद्दल एक वक्तव्य केलं आहे जे सध्या खूप व्हायरल होत आहे. वरुण धवनने चित्रपटसृष्टीत नुकतेच दहा वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या तो त्याच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वरुण धवनने फ्लॉप चित्रपट आणि OTT प्लॅटफाॅम वर चित्रपट दाखवण्या संदर्भात भाष्य केलं. यादरम्यान तो म्हणाला की मला सलमान खानला ओटीपीमध्ये अजिबात पाहायचे नाही.
वरुण धवन म्हणतो की ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचे हिट आणि फ्लॉप वेगवेगळे मोजले जातात. याबद्दल थेट आकडे नाहीत. ज्याच्या आधारे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज लावता येईल. कला व्यक्तिनिष्ठ असल्याचे तो म्हणाला. चित्रपटांच्या नफा-तोट्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर होतो, इतर कोणावर नाही. ओटीपी प्लॅटफॉर्म आल्यापासून बॉक्स ऑफिसवरील दबाव कमी झाल्याचेही त्याने सांगितले.
यामुळे वरुणला OTT वर सलमानला बघायचे नाही.
या मुलाखतीदरम्यान वरुण धवनला विचारण्यात आले की कोणत्या अभिनेत्याने OTT प्लॅटफॉर्मवर येऊ नये. याला उत्तर देताना वरुण धवनने सलमान खानचे नाव घेतले. सलमान खानला OTT वर बघायला आवडणार नाही असे वरुणचे म्हणणे आहे. वरुण धवन म्हणाला की, जेव्हा मी त्याला ईदच्या दिवशी किंवा मोठ्या सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा एक वेगळाच आनंद होतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









