वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत झारखंड संघाचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनने प्रतिनिधीत्व स्वरुपाच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
35 वर्षीय वरुण अॅरोनने 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. त्यानंतर जवळपास 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने 9 कसोटी आणि 9 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या वर्षी वरुण अॅरोनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.









