कुडाळ / वार्ताहर
मराठा समाज सावंतवाडी संस्थान संचलित कुडाळ भगिनी मंडळाच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धेत पिंगुळीच्या वर्षा मनोहर गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा विषय गडकिल्ले असा होता.येथील मराठा सभागृहात सदर स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे आहे.द्वितीय सोनाली रवींद्र गवळी, तृतीय दीप्ती दीपक सिंगनाथ , उत्तेजनार्थ सावली प्रकाश वेंगुर्लेकर व भावना चंद्रकांत परब यांची निवड करण्यात आली.स्पर्धेचे परीक्षण संदीप चिऊलकर यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन संस्था समन्वयक नंदु गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा अदिती सावंत,उपाध्यक्षा स्वाती सावंत तसेच सदस्य रेखा नाईक, वेदिका सावंत, प्रज्ञा राणे, रेखा राऊळ, डॉ.दिपाली काजरेकर , सीमा परब व बालवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धेकाना भेटवस्तू देण्यात आल्या.
स्वागत अदिती सावंत यांनी,तर आभार स्वाती सावंत यांनी मानले. ऐतिहासिक शिवकालीन गडकिल्ल्यांना फार महत्त्व आहे.त्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे.याची जबाबदारी प्रशासनाची आहे तेवढीच आपली सर्वांची आहे.या किल्ल्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी.या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहावे. या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,असे मंडळाच्या अध्यक्षा अदिती सावंत यानी सांगितले.









